धक्कादायक ! पुण्यातील सामूहिक बलात्कार पीडितेवर मुंबईतही अत्याचार; 14 जणांनी बलात्कार केल्याचे निष्पन्न

एका आरोपीला ठाण्यातून अटक

पुणे – वानवडी येथील सामूहिक बलात्कार पीडितेवर मुंबईतही अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. वानवडी पोलिसांनी तपास करत ठाण्यातून आरोपीला अटक केली आहे. यामुळे बलात्कार प्रकरणातील आरोपींची संख्या 15 झाली असून यातील 14 जणांनी बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार रॅकेटचा पूर्ण उलगडा करत पोलिसांनी सात सप्टेंबर रोजी आणखी सहा जणांना अटक केली होती. त्यामुळे या 14 वर्षीय दुर्देवी मुलीवर बलात्कार करणाऱ्यांची संख्या तेव्हा तब्बल 13 इतकी झाली होती. तर बलात्कार झाल्याचे माहिती असून तिला पालकांकडे न सोपवता बिहारला नेणाऱ्या तिच्या मित्रालाही अटक करण्यात आली.

दरम्यान, या सर्व आरोपींना 16 सप्टेंबर पर्यंत कॅटडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दरम्यान पिडीत मुलीकडे केलेल्या तपासात तीच्यावर मुंबई येथील रेल्वे स्थानकात एकाने अत्याचार केल्याचे उघड झाले. यानंतर खडबडून जाग्या झालेल्या पोलिसांनी धावपळ करत ठाणे येथून एका आरोपीला आज अटक केली.

मित्राला भेटण्यासाठी बिहारला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आलेल्या 14 वर्षीय मुलीला प्रवासासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवत तीच्यावर सलग दोन दिवस शहरातील वेगवेगळ्या लॉजमध्ये बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली होती. पोलिसांनी मिसिंग प्रकरणाच्या तपासातून ही घटना उघडकीस आणत त्परतेने आठ जणांना अटक केली होती.

“सामुहिक बलात्कार प्रकरणात ठाण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. यामुळे अत्याचार करणाऱ्यांची संख्या 14 झाली आहे. यासंदर्भात अधिक माहिती तपास सुरु असल्याने देता येणार नाही” – नम्रता पाटील (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ पाच)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.