पुणे – खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा करुन दोन वर्षे फरार झालेला व वेषांतर करुन राहणा-या आरोपीस केले गुन्हेशाखा युनिट चारच्या पथकाने जेरबंद केले. आरोपी गुन्हा केल्यानंतर दोन वर्षे कर्नाटकात पळून गेला होता. यानंतर तो पुन्हा पुण्यात येऊन एका चिकनच्या दुकानात काम करत होता. ओळख लपवण्यासाठी तो दाढी मिशा वाढवून तसेच वेषांतर करुन रहात होता. मात्र गस्ती दरम्यान पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने त्याला ओळखले. जमिर रफिक शेख (जय प्रकाशनगर, येरवडा) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी दिनांक 23/5/2021 रोजी लोहगाव येथे मित्रांसह बोलत थांबले होते. तेव्हा चार ते पाच दुचाकी वाहनावर आलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्याने जुन्या भांडणाच्या कारणावरु फिर्यादी व त्यांचा मित्रावर धारदार हत्याराने डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले होते. तसेच स्थानिक नागरीकांना हत्याराचा धाक दाखवुन दहशत पसरवली होती. गुन्हा केल्यापासुन त्यातील मुख्य आरोपी जमिर शेख हा फरार झालेला होता.
दरम्यान बुधवारी गुन्हे शाखा युनिट चारचे पथक पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत होते. तेव्हा पोलीस नाईक विनोद महाजन यांना खबर मिळाली की, जमिर शेख हा येरवडा चिकन विक्रीच्या दुकानात कामास आलेला आहे. त्यानूसार त्यास ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबुल करत स्वत:ची ओळख सांगितली. शेखवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून कर्नाटक येथे वेषांतर व नाव बदलुन राहत होता. त्यानंतर काही दिवसांपासुन तो नाव बदलुन लक्ष्मीनगर झोपडपट्टीत एका चिकनच्या दुकानात काम करुन तेथेच राहत होता.
ही कारवाई पोलीस निरीक्षक गणेश माने यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फौजदार महेंद्र पवार, पोलीस अंमलदार संजय आढारी, विनोद महाजन, स्वप्निल कांबळे यांनी केली आहे.