पुणे – हांडेवाडीतील शेवाळेवाडी फाटा येथील किस्टोन कॉलेजकडे जाणार्या रस्त्यावर पार्क केलेल्या स्क्रॅप सेंटर समोरील चार कार अज्ञातांनी जाळल्या. याप्रकरणी अज्ञातांवर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत श्रीपाल रमणीकलाल शहा (वय ३६, रा. शांतीनगर सोसायटी, गोकुळ हॉटेल समोर, कोंढवा) यांनी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी श्रीपाल शहा यांचे शेवाळेवाडी फाटा येथे नॅशनल स्क्रॅप सेंटर नावाने दुकान असून जुन्या गाड्या खरेदी करुन रिपेअर करुन त्यांची विक्रीचा व्यवसाय आहे. १ सप्टेंबर रोजी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास दुकानाचे समोरील दोन गाड्यांना कोणीतरी आग लावली. या आगीत त्या शेजारी पार्क केलेल्या आणखी दोन चारचाकी गाड्यांना आग लागून तब्बल २ लाख ७५ हजारांचे नुकसान झाले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक देशमुख करत आहेत.