पुणे – भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद सदनिका फोडून सुमारे सव्वातीन लाखाचा ऐवज चोरण्यात आला. या परिसरातील एकूण पाच सदनिका फोडण्यात आल्या आहेत. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर खेडेकर (31 ,रा.आंबेगाव-बुद्रुक,पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी बाहेर गावी असताना दिनांक 8 मे ते दि.13 जून दरम्यान त्यांची सुमन संकल्प बिल्डिंग,बी-विंग,न.401 मधील सदनिका फोडण्यात आली. तसेच शेजारी इतर एक सदनिका, शिवदत्ता हाईट्स मधील एक सदनिका व रमणा हाईट्सल मधील दोन सदनिका फोडण्यात आल्या.
यातील फिर्यादी यांची राहती सदनिका कुलुप लावुन बंद असताना, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मुख्य दरवाजाचे कुलुप कशाचे तरी सहाय्याने उचकटुन, त्यावाटे आंत प्रवेश केला. यानंतर बेडरूम मधील कपाटातील सोन्याचे दागिने असा एकुण 3 लाख 33 हजार रूपये किमतीचा ऐवज घरफोडी चोरी करून नेला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे करत आहेत.