पुणे – मोक्का कारवाई केल्यानंतर फरारी झालेल्या गुंडाला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून मेफेड्रोन नावाचा अमली पदार्थ, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अफाक अन्सार खान (वय २४, रा. रविवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
खान याच्याविरोधात फरासखाना पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याान्वये कारवाई केली होती. कारवाई केल्यानंतर तो पसार झाला होता. तो कोंढवा भागात येणार असल्याची माहिती पोलीस नाईक ज्योतीबा पवार यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून खानला पकडण्यात आले. त्याच्याकडून २ ग्रॅम मेफे ड्रोन आणि दुचाकी असा ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
खानकडून जप्त करण्यात आलेल्या मेफेड्रोनची किंमत १३ हजार ५०० रुपये आहे. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक शब्बीर सय्यद, सहाय्यक निरीक्षक चेतन मोरे, रमेश गरूड, तुषार आल्हाट, संजीव कळंबे, निलेश वणवे, निलेश देसाई आदींनी ही कारवाई केली.