Pune Crime: श्वानप्रेमी महिलेला धक्काबुक्की, चौघांवर गुन्हा

पुणे – भटक्या श्वानांना खायला देणाऱ्या एका महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. मारहाण तसेच महिलेचा विनयभंग केल्याप्रकऱणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला. आरोपींनी महिलेच्या मोटारीवरील चालकाला मारहाण केली.
याप्रकरणी जुनैद खान (रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा ) तसेच त्याच्या तीन भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ४८ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिला भटक्या श्वानांना खायला देते. कोंढव्यातील इम्पिरीअल हाईटस सोसायटीसमोर पदपथावर तक्रारदार महिला भटक्या श्वानांना खाद्यपदार्थ देत होती. त्यावेळी खान आणि त्याच्या भावांनी महिलेबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपींनी महिलेला मारहाण केली तसेच तिच्याबरोबर लज्जास्पक वर्तन करून विनयभंग केला. महिलेच्या मोटारीवरील चालक विकास वर्मा याच्या कठीण वस्तूने मारहाण केली. त्यामुळे वर्मा याच्या भुवईजवळ जखम झाली. तक्रारदार महिला आणि वर्मा यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच भटक्या श्वानांना मारून टाकण्याची धमकी आरोपींनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.