पुणे – लॉकडाऊनच्या काळातही हॉटेल मध्ये रुम बुक करुन नाच गाणे पार्टी करणा-या लोकांवर सिंहगड पायथ्याजवळ स्थानिक गुन्हे छापा टाकला. याप्रकरणी हॉटेल चालकासह सात जणांवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणात एक प्रतिष्ठीत डॉक्टर पळून गेला आहे. ही कारवाई मौजे गोळेवाडी गावचे हद्दीतील हॉटेल सानवी रिसॉटमध्ये करण्यात आली.
विनय सुभाष कांबळे ( 32 रा. आकाश नगर वारजे) संदीप शंकर कोतवाल (47 रा.हिंगणेमळा, हडपसर ), सचिन विठठल शिंदे (38 रा. आनंदनगर सिंहगडरोड), कालीदास शशिराव काकडे (50 रा. हडपसर), विठठल विजय मोरे (43 रा. हडपसर), राजेश बलभिम वाघमारे ( 45 रा. हडपसर व इतर चार महिला पार्टी करताना आढळून आल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्त घालत असताना, त्यांना सिंहगड किल्लयाच्या पायथ्याशी एका लॉजवर पार्टी सुरु असल्याची खबर मिळाली. त्यानूसार हॉटेल मालक नामे विनय सुभाष कांबळे व त्याचा मित्र डॉ. निखील भाकरे (रा. भाकरे मल्टी स्पेशलिटी हॉस्पीटल दत्तनगर चौक आंबेगाव पुणे) हे हॉटेल मध्ये रुम नं.6 व 7 मध्ये डान्स चा कार्यक्रम आयोजीत करुन गर्दी जमावजमव करत आहेत असे समजले.
त्यानूसार हॉटेल सानवी रिसॉट या ठिकाणी छापा टाकण्यात आला. तेथे साउंड सिस्टीमवर गाणी लावून एल.ई. डी. लावून काही वरील लोक मिळून आले. हे सर्व तोडांवर मास्क परिधान न करता एल.ई. डी लाईट लावून साउंड सिस्टीमवर गाणी लावून नाच करत असताना मिळून आले व डॉ. निखील भाकरे हा अंधाराचा फायदा घेवून पळून गेला. त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या करोना संदर्भातील आदेशाचा भंग केला आहे.
डॉ. निखील भाकरे व हॉटेल चालक विनय कांबळे व इतर सर्व यांचेवर सदर बाबत हवेली पोलीस स्टेशन करण्यात आली आहे. ही कार्यवाही पोलीस अधिक्षक विवेक पाटीलस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस अंमलदार पासलकर, क्षिरसागर, मंगेश भगत, अमोल शेडगे, नंदा कदम यांनी केली आहे.