पुणे – बारावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनिला गुण वाढविण्याचे आमिष दाखवत शरीर सुखाची मागणी करण्यात आली. ही मागणी करणाऱ्या महाविद्यालय प्रशासकीय कर्मचाऱ्याला मुलीच्या घरच्यांनी चोप देत त्याची महाविद्यायल ते पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात विनयभंग व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजित पवार असे महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपीने संबंधीत मुलीला अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवतो, स्कॉलरशीप मिळवून देतो, मार्क वाढवून टॉप लेव्हलला पोहचवतो असे आमिष दाखवले होते.
तो मागील तीन दिवसांपासून तीच्या मागे लागला होता. तीने घरच्यांना माहिती दिल्यावर पालकांनी गमिनी कावा संघटनेच्या कार्यकर्त्यांसह महाविद्यालय गाठले. यानंतर त्याला जाब विचारला असता, त्याने नकार दिला. मात्र मुलीने त्याचा फोन रेकॉडिंग केला होता. हे त्याला दाखवल्यावर मात्र त्याची बोलती बंद झाली.
“पालकांनी संबंधीत कर्मचाऱ्यास पोलीस ठाण्यात आणले आहे. त्यांची रितसर तक्रार दाखल करुन विनयभंग व इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत आहे. ईतर कोणासोबत असा प्रकार झाला असल्याचे त्यांनी तक्रार करण्यास पुढे यावे.” — विजय तिकोणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग)