Pune Crime | घरफोडीसह वाहनचोरी करणारे सराईत गुन्हेगार अटकेत; लाखोंचा ऐवज जप्त

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी

पुणे, दि.17- शहरातील विविध भागात घरफोडी आणि वाहनचोरी करणाऱ्या सराईतांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी चार गुन्हे उघडकीस आणून चांदीचा हार, चांदीच्या पट्टया, टीव्ही, कॅमेरा, 16 मोबाईल असा मिळून 1 लाख 62 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सोहेल कादर शेख (23 , रा. अपर बिबवेवाडी) आणि जितेंद्र शंकर चिंधे (27 , रा. दत्तनगर, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पथक सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी डॉल्फिन चौकात दुचाकीवर बसलेले दोघेजण पळून जात असल्याचे पोलीस अमंलदार सतीश मोरे आणि तानाजी सागर यांना दिसून आले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून सोहेल आणि जितेंद्रला ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडील पिशवीत विविध वैंपन्यांचे मोबाईल मिळून आले.

अधिक चौकशीत त्यांनी चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर, अमित पुजारी, सतीश मोरे, तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी, अतुल महांगडे, अमोल शितोळे, दीपक लोधा, राहूल कोठावळे यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.