Pune Crime : बसमध्ये चढताना हात साफ! दोन महिलांचे लाखो रुपयांचे दागिने लंपास
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पुणे – स्वारगेटमध्ये महिलांकडील दोन लाखांचे दागिने चोरट्यांनी लांबविले. पहिल्या घटनेत पीएमपी प्रवासी महिलेच्या हातातील दीड लाखांची सोन्याची बांगडी लांबविण्यात आली. तक्रारदार धायरीकडे जाणाऱ्या पीएमपी बसमध्ये प्रवेश करत असताना गर्दीत चोरट्यांनी कटरचा वापर करुन बांगडी लांबविली. पोलीस उपनिरीक्षक केतकार तपास करत आहेत.
स्वारगेट स्थानकाच्या आवरात ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले. पंढरपूरला जाणाऱ्या बसमध्ये प्रवेश करतांना मंगळसूत्र हिसकावून नेले. दागिने गेल्याचे लक्षात आल्यानंतर हडपसरला उतरून महिलेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस कर्मचारी प्रवीण पाेटे तपास करत आहेत.





