पुणे – कुमठेकर रस्त्यावर पादचारी नागरिकाकडील 50 हजारांची रोकड असलेली पिशवी हिसकावणाऱ्या चोरट्यांना पकडले. अली अजगर इक्बाल नजे (वय 38, रा. रोहिदास वाडा, आझाद फरिद चाळ, ठाणे), यासीन इमाम शेख (वय 24, रा. हाजी मलंग वाडी, अंबरनाथ, जि. ठाणे), राजेश राधेश्याम सिंग (वय 35, रा. वाशी नाका, चेंबूर, मुंबई), रवींद्र वसंत पांचाळ (वय 50, रा. काळा तलाव, कल्याण, जि. ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
प्रकाश उपळकर (वय 59) यांनी यासंदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उपळकर शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कुमठेकर रस्त्याने निघाले होते.
चितळे बंधू मिठाईवालेजवळ चोरट्यांनी त्यांच्याकडील 50 हजारांची रोकड असलेली पिशवी हिसकावली. उपळकर यांनी आरडाओरडा केला. पसार होण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.