पुणे – देहविक्री करणार्या आठ महिलांच्या विरुद्ध सिंहगडरोड पोलिसांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय (35) यानी फिर्याद दिली आहे.
आरोपी महिला वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने रोडवरून येणार्या-जाणार्या नागरिकांकडे पाहून अश्लिल हावभाव, अंगविक्षेप व हातवारे करून तोंडाने खुनावून रहदारीस अडथळा निर्माण करीत असताना मिळून आल्या आहेत. रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.23) रात्री 9 वाजातच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक जायभाय यांना माहिती मिळाली होती की, नवले ब्रिजखाली काही महिला वेश्याव्यवसायासाठी थांबलेल्या आहेत. त्या अश्लिल हावभाव करून ग्राहकांना आवाज देवून बोलावत आहेत.
जायभाय यानी ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांना कळवली. त्यांनी खात्री केल्यानंतर जायभाये यांनी महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांना सोबत घेवून नवले ब्रिज गाठला, तेथे महिला आढळून आल्या. यानंतर पथकाने छापा टाकून महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे मिळून आलेला मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे करीत आहेत.