पुणे – शुक्रवारी दिवसभरात शहरात तीन ठिकाणी घरफोडीच्या घटनांचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवणे येथील महिला कुटुंबासह मुळशी येथे गेल्या असताना चोरट्यांनी फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून 48 हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. त्यांनी उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
ऊरुळी देवाची येथील बंगल्याच्या किचनची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व 1 लाख 43 हजार 500 रुपयांचे 46 ग्रॅम वजनांचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली. याप्रकरणी पारस छाजेड (वय 55, रा. गुरुकृपा बंगला, ऊरळी देवाची) यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.