#PuneCrime | 197 किलो गांजा बाळगल्याप्रकरणात चालकाला जामीन

पुणे – तब्बल 197 किलो 866 ग्रॅम सुमारे दहा लाख रुपये किंमतीचा विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगल्याच्या आरोप असलेल्याला सत्र न्यायाधीश जे.एन.राजे यांनी 50 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला.

सचिन मोतीराम मंजुळे (वय 30, रा. अनसारवाडी, ता. निलंगा, जि. लातुर) असे त्याचे नाव आहे. त्याने अॅड. सी.बी.कचरे, अॅड. खंडेराव टाचले आणि अॅड. मनिष मगर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. 30 मार्च 2018 रोजी गहुंजे गावाजवळ स्कोडा गाडीतून या गांजाची वाहतुक करण्यात येत होती.

पोलिसांना पाहून दोघेजण पळून गेले. त्या गाडीचा चालक असल्याचा आरोप मंजुळे याच्यावर आहे. त्याच्यासह तिघांवर शिरगाव परंदवाडी चौकी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याने न्यायालयीन कोठडीत असताना जामिनासाठी अर्ज केला. त्याचे नाव एफआयआरमध्ये नाही. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नाही. तो गाडी चालवत असल्याचा कोणताही पुरावा नाही. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी अॅड. कचरे आणि अॅड. टाचले यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.