पुणे – चाकूने मानेवर वार करून सख्या बहिणीच्या खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी भावाला अटक केली. धिरज दिलीप नवले (वय.30, रा. झेड कॉर्नर मांजरी हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत 33 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना घोरपडी परिसरात 4 जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. घरगुती कारण व आईला सतत भेटण्याच्या कारणातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी बहीन-भाऊ आहेत. फिर्यादी ह्या आईला बस स्टॉपला सोडून घरी आल्या होत्या. त्यावेळी आरोपी हा देखील आजीसोबत घरी आला होता. त्यावेळी त्याने आईल सारखी का भेटते व इतर घरगुती कारणातून फिर्यादीसोबत वाद सुरू केला.
गळा दाबून तुला खल्लास करतो अशी धमकी देत किचन मधील चाकू फिर्यादीच्या गळ्याला लावून जीवे ठार मारण्याच्या हेतूने मानेवर वार करून जबर जखमी केले. त्यानंतर संबधीत महिलेने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली होती. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पोटे करीत आहेत.