पुणे – तरुणाच्या खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. चार दिवसांपुर्वी झालेल्या भांडणातून ही घटना घडली आहे.
दत्ता वाव्हळकर (25,रा.वांजळे कॉम्पलेक्स, अहिरे गाव, वारजे) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार महेश वांजळे, शुभम मानकर यांना अटक केली असून त्यांचे साथीदार अजय कांबळे आणि रवि धनवडे यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. यातील फिर्यादी दत्ता याने चार दिवसांपुर्वीच महेश वांजळेला शिवीगाळ केली होती. याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यांनी संगणमत करुन फिर्यादीच्या रहात्या घराच्या पार्किंगमध्ये त्याला गाठले. यानंतर त्याच्या डोक्यात कोयता, विटा आणि फरशी मारुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर परिसरातील लोकांना कोयत्याची दहशत दाखवत त्यांच्या अंगावर धाऊन जात परिसरातील दुकानेही जबरदस्तीने बंद करण्यास भाग पाडले.