पुणे – वैमनस्यातून एकाचे घर पेटवून देण्यात आल्याची घटना कोथरूडमधील म्हातोबानगर शुक्रवारी मध्यरात्री घडली. जाळपोळीत बारदाने ठेवलेले गोदाम, रिक्षा आणि दुचाकी जळून भस्मसात झाली.
याप्रकरणी सिद्धार्थ मराठे (रा. प्रतीकनगर, पौड रस्ता) आणि त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र वसंत कडू (वय ३७, रा. म्हातोबानगर, कोथरूड) यांनी यासंदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कडू यांच्या भावाबरोबर आरोपी मराठे याचे भांडण झाले होते. शुक्रवारी मध्यरात्री मराठे आणि साथीदाराने कडू यांचे घराच्या परिसरात ज्वलनशील पदार्थ ओतून लाग लावली. शेजारी असलेल्या बारदानांच्या गोदामाला आग लागली तसेच या परिसरातील एक रिक्षा आणि दुचाकीही जळून भस्मसात झाली. पोलीस उपनिरीक्षक कोळी तपास करत आहेत.