पुणे – गावठी पिस्तुल बाळगणाऱ्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकच्या पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून पिस्तुल, दोन राऊंड असा 40 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अक्षय दिलीप रावडे (वय 27, रा. किरकिटवाडी, ता. हवेली) असे त्याचे नाव आहे.
शहराच्या हद्दीत खंडणी विरोधी पथक एकचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस नाईक राजेंद्र लांडगे, विवेक जाधव, नितीन रावळ, प्रफुल्ल चव्हाण हे गुन्हे प्रतिबंधित करण्यासाठी गस्त घाल होते.
त्यावेळी पोलीस नाईक राजेंद्र लांडगे आणि पोलीस अंमलदार प्रफुल चव्हाण यांना एक व्यक्ती पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळली. त्यानुसार पारी चौक, नऱ्हे येथे सापळा रचुन त्यास ताब्यात घेतले.
त्याच्यावर सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3 आणि 5, पोलीस अधिनियम कलम 37(1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस नाईक नितीन कांबळे,
राजेंद्र लांडगे, नितीन रावळ, विवेक जाधव, प्रफुल्ल चव्हाण, गजानन सोनवलकर, विजय कांबळे, हनुमंत कांदे, पिराजी बेले यांनी ही कारवाई केली.