पुणे – पुण्यातील जुन्या जिल्हा परिषद जवळील बाेलाई माता मंदिर येथे १२ ऑगस्ट राेजी रात्री साडेनऊ वाजण्याचे सुमारास देवीचा चांदीचा मुकुट व दागिन्यांची चाेरी झाल्याची घटना घडली हाेती. समर्थ पाेलीस ठाण्याचे तपास पथकाने याप्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास करत संशयित आराेपीचा शाेध घेऊन त्यास जेरबंद केले आहे. अनिल हाैशीलाल चव्हाण (वय-३१,रा.वडजाई, ता.हवेली,पुणे) असे अटक केलेल्या आराेपीचे नाव आहे.
आराेपीच्या ताब्यातून पाेलीसांनी चाेरी केलेले देवीचे दागिने व चांदीचा मुकुट हस्तगत केला आहे. गुन्हयाचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणाचे आधारे चाेरी झाली तेव्हापासून पाेलीसांनी आराेपीचा शाेध सुरु केला हाेता परंतु ताे मिळून येत नव्हता. शहरातील इतरत्रचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी केले असता पुणे स्टेशन व आसपासच्या भागात ताे फिरल्याचे दिसून आले. त्यावरुन तपास पथकाने सर्व सीसीटीव्ही फुटेज, खबरे व इतर सर्व प्रकारे रात्रदिवस तपास करुन आराेपीचा शहर व परिसरात शाेध घेतला.
फुटेज मधील आराेपीची ओळख पटविण्यासाठी आसपासच्या नागरिकांना फुटेज दाखवून आराेपीची ओळख पटवून तपासाची दिशा ठरविण्यात आली. त्यावेळी मंगळवार पेठ, बारणे राेड येथे सीसीटीव्हीत आराेपी दिसून आला. त्यामुळे पाेलीसांनी धाव घेत त्यास ताब्यात ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता चाेरीचे दागिने मिळून आले.
याप्रकरणी आराेपीवर चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास सहाय्यक पाेलीस निरीक्षक संदीप जाेरे हे करत आहे. वरिष्ठ पाेलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे व पाेलीस निरीक्षक (गुन्हे) उल्हास कदम यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पाे.निरी.सतिश भालेराव, पाेलीस अंमलदार सुशील लाेणकर, संताेष काळे, सुभाष पिंगळे, महेश जाधव, निलेश साबळे,हेमंत पेरणे, सुभाष माेरे यांचे पथकाने सदर कारवाई केली.