Pune Crime : तुला धंदा करायचा असेल तर 5 पेटी दे, नाहीतर गोळ्या घालील; स्क्रॅप व्यवसायीकाकडे खंडणी मागणारे ‘जेरबंद’

पुणे – स्क्रॅप व्यवसायीकाकडून खंडणीची रक्कम घेताना दोघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. याप्रकरणात आणखी दोघांचा समावेश असल्याने त्यांच्या विरुध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवसायीकाला फोन करुन “तुला धंदा करायचा असेल तर 5 पेटी दे, नाहीतर गोळ्या घालील’ अशी धमकी देण्यात आली होती.

याप्रकरणी हबीब रायनी ( 34 रा. खांदवेनगर,नगर रोड, लोहगाव) हे खराडी आय टी पार्क या ठिकाणी कंपनीचे स्क्रॅप विक्रेते असून त्यांना दि 5/3/2021 रोजी पासून अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन येत होते. फोन करणारे “तुला धंदा करायचा असेल तर 5 पेटी दे, नाहीतर गोळ्या घालील”असे म्हणून खंडणी मागणी करण्यात येत होती.

तक्रार दाखल झाल्यावर खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा कारवाई करून राहुल जाधव ( रा शिंदे वाडी लोहगाव) व योगेश चांदणे (28 रा गणपती चौक विमाननगर) यांना 2 लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना कल्याणी नगर, येरवडा येथे रंगेहाथ पकडले. त्यामध्ये आणखी दोन आरोपी रामा माने ( 30, रा.दुर्गा माता मंदिर मागे, चंदननगर) व प्रवीण गुलाब जाधव (27,रा. वडगाव शिंदे, शिंदे वस्ती,ता.हवेली ) यांची नावे निष्पन्न झाली. या सर्वांविरुध्द येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार संपत अवचरे,विजय गुरव,अमोल पिलाने,संग्राम शिनगारे, भूषण शेलार,प्रदीप गाडे,विनोद साळुंके, प्रदीप शितोळे, सचिन अहिवळे,सुरेंद्र जगदाळे व महिला पोलीस अंमलदार आशा कोळेकर,रुपाली कर्णवर यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.