पुणे – चलनातून बाद झालेल्या दोनशे कोटीच्या नोटा आपल्याकडे असून त्या बदलून देण्यास भारतीय रिझर्व बॅंकेने परवानगी दिली आहे. या नोटा बॅंकरकडून बदलून आणल्यास पाच टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना जाळ्यात ओढणाऱ्या लष्करातील एका शिपायास अटक करण्यात आली. त्याच्याकडून चलनातून बाद झालेल्या हजार रुपयांच्या नोटा तसेच चिल्ड्रन बॅंकेच्या नोटा अशा सहा पोती बनावट नोटा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने हस्तगत केल्या आहेत.
आण्णासाहेब अर्जुन घायतिडक (रा.रेंजहिल्स खडकी) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याने सुमारे दोन महिण्यापुर्वी संतोष रामचंद्र राजे (43 रा. सातारा) याची चार लाखाची फसवणूक केली होती. तो पुन्हा फसवणूक करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सहायक पोलीस फौजदार तानाजी कांबळे यांना मिळालेल्या खबरीवरुन अर्जुन घायतिडक याचे राहते घरी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने छापा टाकला.
त्याचे राहते घरात जुन्या बंद झालेल्या 1000 रु दराच्या 56 नोटा दर्शनी भागावर लावुन त्याखाली भारतीय मनोरंजन बॅंक असं लिहिलेल्या बनावट नोटा लावुन 56 बंडल तयार केलेले होते. बनावट नोटांवर भारतीय मनोरंजन बॅंक असे नमुद असुन त्यावर अक्षरी व अंकात 1000 रु, महात्मा गांधी यांचे चित्र छापलेले आहे. हुबेहुब जुन्या बंद झालेल्या 1000 रु सारखे दिसणा-या नोंटा तसेच 500 रु नोटांसारखे हुबेहुब दिसणा-या 400 नोटा त्यावर भारतीय रिव्हर्स बॅंक असे छापलेले व महात्मा गांधी यांचे चित्र असलेल्या राहते घरी मिळुन आल्या.
तसेच आरोपीची टाटा सफारी गाडी मध्ये वरील प्रमाणेच 1000 रु चे बंद झालेल्या नोटां प्रमाणे हुबेहुब दिसणारे 400 नोटा त्यावर भारतीय रिव्हर्स बॅंक असे छापलेले व महात्मा गांधी यांचे चित्र असलेल्या राहते घरी मिळुन आल्या. तसेच आरोपीची टाटा सफारी गाडी मध्ये वरील प्रमाणेच 1000 रु चे बंद झालेल्या नोटां प्रमाणे हुबेहुब दिसणारे नोटांचे 232 बंडल असे 6 गोण्यांमध्ये मिळुन आले. अशा एकुण 288 नोटांचे बंडल (कि रु 24 ,35,440 ), टाटा सफारी गाडी कि रु 3 लाख व 100 दराची सॅंक असा एकुण 27, 35, 440 चा माल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,सह पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे,अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे,सहा पोलीस आयुक्त श्री.लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सुनिल पंधरकर, पोलीस उप निरीक्षक गुंगा जगताप, सहा.पोलीस उप निरीक्षक तानाजी कांबळे, पोलीस अंमलदार अभंगे,लोखडे, शिंदे, खान, काळभोर, मनोज खरपुडे, शिवाजी जाधव, अमोल सरतापे यांनी केली आहे.