Pune Crime : लष्कर पेपर फुटी प्रकरणी लष्करातील बडा अधिकारी ‘अटक’

पुणे – लष्कर पेपर फुटी प्रकरणी गुन्हे शाखेने तामिळनाडूच्या वेलिंग्टन येथून रविवारी लष्कराच्या एका मेजर रॅंकच्या अधिकाऱ्याला अटक केली. शनिवारी वेलिंग्टन येथे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

रविवारी पहाटे त्याला पुण्यात आणण्यात आले आणि दुपारी औपचारिकरित्या अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सैनिक भरतीची अखिल भारतीय प्रवेश परीक्षा (सामान्य कर्तव्य) मागील रविवारी रद्द करावी लागली.

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, “या प्रकरणात ही नवीन अटक आहे. या प्रकरणात आमची चौकशी चालू असल्याने या वेळी पुढील माहिती सांगणे योग्य ठरणार नसल्याचे स्पष्ट केले
लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, अटक करण्यात आलेला अधिकारी मोठ्या हुद्दयावरील आहे.

त्याने पेपर लिक केल्याचा संशय आहे. त्याने वानवडी पोलिसात नोंदलेल्या प्रकरणात अटक केलेल्या संशयितांपैकी एकाला प्रश्नपत्रिका पाठवल्याचा संशय आहे. या अटकेमुळे एकूण आरोपींची संख्या नऊ झाली आहे.

गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव रविवारी जाहीर करायचे होते पण सैन्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतरच ते जाहीर केले जाईल. दरम्यान संबंधीत अधिकाऱ्याच्या चौकशीत आणखी दोन अधिकाऱ्यांची नावे पुढे आल्याची चर्चा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.