Pune Crime | बोपदेव घाटात वाहनचालकास लूटल्याची आणखी एक घटना

पुणे – बोपदेव घाटात दुचाकी लावून बाजूला बसलेल्या व्यक्तीस सहा जणांच्या टोळीने लूटले. चाकूचा धाक दाखवत मारहाण करुन दोन मोबाईल व रोख 9 हजार रुपये चोरण्यात आले. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसापुर्वीच येथे एका दुचाकीस्वाराचा मोबाईल चोरण्यात आला होता.

एका 21 वर्षीय तरुणाने दिलेल्या फिर्यादीनूसार तो 25 मार्च रोजी दुचाकीवरुन बोपदेव घाटात गेला होता. तेथे दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून तो कठड्यावर बसला. दरम्यान दुचाकींवरुन सहा जणांचे टोळके तेथे आले. त्यांनी चाकुचा धाक दाखवून हाताने मारहाण करत त्याच्या जवळील दोन मोबाईल व रोख 9 हजार रुपये हिसकावून घेतले.

या घटनेने घाबरल्याने फिर्यादीची मानसिक परिस्थिती बिघडली होती. यामुळे त्यांनी तक्रार दाखल केली नव्हती. गावावरुन परत आल्यावर त्यांनी तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.