पुणे – लोखंडी कोयत्याने जबर मारहाण करत तिघांनी एका अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने लुटले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी प्रविण आनंता येणपुरं (वय.27,रा. पाबे,ता. वेल्हा) याला अटक केली असून, त्याच्या इतर दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आंबेगाव खुर्द येथील 17 वर्षीय मुलाने फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी रात्री पावने दहाच्या सुमारास अटल गल्ली आंबेगाव खुर्द येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघा आरोपींनी संगणमत करत फिर्यादी मुलाल हाताने व उलट्या कोयत्याने जबर मारहाण केली. मारहाणीत मुलाला गंभीर जखम झाली आहे. त्यानंतर त्याच्या पॅण्टच्या डाव्या खिशातील दोन हजाराची रोकड जबरदस्तीने काढून घेतली.
एवढेच नाही तर हातातील कोयता नाचवत आता परत इथ दिसायचं नाही काय काम असलं तरी यायचं नाही. जा सांग कोणाला सांगायचं ते पपू येणपुरे ने मारलं म्हणून असे म्हणत आरडा-ओरडा करत परिसरात दहशत निर्माण केली. आरोपींचा राडा पाहून रस्त्यावरून येणार्या-जाणार्या लोकांनी पळ काढला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कवटेकर करीत आहेत.