पुणे – एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच आतेभावाने जबरदस्तीने लेैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार आष्टापुररोड परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी, लोणीकंद पोलिस ठाण्यात 30 वर्षीय व्यक्तीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवार (दि.14) रोजी घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत अल्पवयीन मुलगी व आरोपी हे मुळचे उत्तरप्रदेश येथील रहिवाशी आहेत. अल्पवयीन मुलीग राहते घरी दुपारी साडेचारच्या सुमारास झोपली असताना, आरोपीने जबरदस्तीने शरिरसंबंध प्रस्थापित केले.
मुलीने त्याला विरोध केला असता, कोणाला काही सांगितले तर तुला सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. त्यानंतर पिडीत मुलीने झालेला हा सर्व प्रकार घरच्यांच्या कानावर घातला. त्यानुसार पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास लोणीकंद पोलिस करीत आहेत.