पुणे – कौटुंबिक हिंसाचारातून पतीने पत्नीच्या गालावर चाकु खूपसला. मात्र हा हल्ला इतका भयंकर होती की, चाकु पत्नीच्या गालातून जबडा पार करत गळ्यापर्यंत घुसला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पतीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण भारत वाघमारे (37,रा. मांजरी,हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, किरण त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. त्याने भांडणात तीच्या तोंडवार चाकू खुपसून वार केला. यानंतर त्याच्या दोन्ही मुलिंच्याही मागे तो चाकू घेऊन लागला होता. मुली पळून गेल्याने बचावल्या. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरक्षक पाटील करत आहेत.