पुणे – खूनाच्या गुन्हयात सात वर्षापासून फरार असलेल्या गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने अटक केली. शंकर मनोहर कांबळे (33 रा. काळे ओढा केसनंद रोड, वाघोली) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटीलहद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधात्मक गस्त करित होते. यावेळी पोलीस अंमलदार ऋषिकेश व्यवहारे व ऋषिकेश ताकवणे यांना खबर मिळाली की, लोणकंद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खूनाच्या गुन्हयातील आरोपी कांबळे हा केसनंद रोड येथे येणार आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने यांना कळविले असता कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानूसार कांबळेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्हयाबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. त्याला पुढील कार्यवाही करिता लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी मागील सात वर्षापासुन आपले वास्तव्याचे ठिकाण बदलुन राहत होता. पोलीस येणार असल्याचा संशय येताच पोलीसांना गुंगारा देऊन फरार होत असे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेद्र पाटील अंमलदार मच्छिंद्र वाळके, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, नितीन धाडगे, नितीन मुंढे, प्रतिक लाहिगुडे, कानिफनाथ कारखिले,नितीन शिंदे, शेखर काटे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.