पुणे – कामाकरिता पैशांची गरज असल्याने एका कामगाराने खासगी व्यवसायिकाकडून २५ हजार रुपयांचे कर्ज घेतले हाेते. त्याबदल्यात त्याने वेळाेवेळी एकूण ५३ हजार रुपये परत केले हाेते. मात्र, त्यानंतरही आणखी ५५ हजार रुपयांची मागणी करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाेलीसांनी कैलास बाबुराव बिबवे (रा.बिबवेवाडी,पुणे) याचे विराेधात सावकारी अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बिबवेवाडी पाेलीस ठाण्यात अजयकुमार इंद्रजित तिवारी (रा.आंबेगाव,पुणे) यांनी पाेलीसांकडे तक्रार दिली आहे. मार्च २०१८ मध्ये तिवारी यांनी बिबवे यांचेकडून गरजेपाेटी २५ हजार रुपये कर्ज घेतले हाेते. परंतु त्यातील दहा टक्के रक्कम ही व्याजापाेटी कापून घेण्यात आली हाेती. त्यानंतर तिवारी यांनी सप्टेंबर २०२० पर्यंत वेळाेवेळी एकूण ५३ हजार रुपयांची परतफेड केली हाेती. परंतु त्यानंतरही आराेपी फाेन करुन तसेच राहते घरी येऊन शिवीगाळ, दमदाटी करुन आणखी ५५ हजार रुपयांची मागणी करत हाेता.
या त्रासला कंटाळून तिवारी यांनी गुन्हे शाखेच्या खंडणी विराेधी पथकाकडे धाव घेतली. पाेलीस निरीक्षक बालाजी मांढरे यांनी याप्रकरणी आराेपी विराेधात बिबवेवाडी पाेलीस ठाण्यात तक्रार देण्यास फिर्यांदींना सांगून आराेपीला अटक करुन बिबवेवाडी पाेलीसांचे स्वाधीन केले आहे.