पुणे – चेष्टा मस्करीतून झालेल्या वादात एका तरुणावर रविवारी (दि.8) कोयत्याने वार करण्यात आले होते. गंभीर जखमी झाल्याने संबंधीत तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयदीप ज्ञानेश्वर भोंडेकर (22, रा. गुजर कॉम्प्लेक्स, मासे आळी, उत्तमनगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी, उत्तमनगर पोलिसांनी अमित सुदाम गुजर (वय.21,रा. मासे आळी उत्तमनगर) याला अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध सुरुवातीला खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता त्यामध्ये खूनाचे कलमवाढ करण्यात आले आहे.
याबाबत जयदीप याची आई लक्ष्मी ज्ञानेश्वर भोंडेंकर (वय.42,रा.मासे आळी उत्तमनगर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी (दि.8) दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास जुनी मासे आळी उत्तमनगर परिसरात घडली आहे. दरम्यान, जयदीप याच्या नातेवाईकांनी उत्तमगनर पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळी गर्दी केली होती.