पुणे – शहरातील एका बड्या इंटेरिअर डेकोरेटरची 3 कोटी 62 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. त्याला एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नवीन कार्यालयाचे बांधकाम व इंटेरिअरचे काम देण्यात आले होते.
याप्रकरणी युसेउंगसॅंग इंडिया कंन्स्ट्रक्शन प्रा.लि कंपनीचा कोरियन अधिकारी हर सेंग हवी आणी सिओक हो चॅंग(51, मुळ कोरीया, कार्यालय, औरंगाबाद व चेन्नई) यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी सुशमेश शर्मा(51,रा.बी.टी.कवडे रोड) यांना आरोपींनी एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकरीता बांधकाम व इंटेरिअर काम करण्याची वर्क ऑर्डर दिली होती. हे काम पुर्ण केल्यानंतर शर्मा यांना 3 कोटी 62 लाख 94 हजार देण्यात आले नाहीत. आरोपी चेन्नई व औरंगाबाद येथील दोन्ही ठिकाणची कार्यालये बंद करुन पळून गेले. याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नलवडे करत आहेत.