Pune : कोविशील्ड आजही नाही!

पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे मंगळवारी केवळ कोवॅक्‍सिन डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, ते सहा केंद्रांवर मिळतील. या प्रत्येक केंद्रांवर प्रत्येकी 300 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

18 वर्षांवरील नागरिकांना मंगळवारी कोवॅक्‍सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 20 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.

याशिवाय 6 जुलैला कोवॅक्‍सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्या 18 वर्षांवरील नागरिकांना मंगळवारी 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे तर 20 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल. दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दी स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने पहिला आणि दुसरा डोस

  • 6 केंद्रांवर कोवॅक्‍सिनचेच डोस मिळणार
  • कोवॅक्‍सिनचे डोस मिळण्याची केंद्रे
  • येरवडा- राजीव गांधी रुग्णालय
  • कोथरूड- कै. जयाबाई सुतार दवाखाना
  • कर्वेनगर- कै. बिंदूमाधव ठाकरे दवाखाना
  • गाडीखाना- कै. मालती काची दवाखाना
  • महंमदवाडी- कै. दशरथ भानगिरे दवाखाना
  • ससून सर्वोपचार रुग्णालय

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.