पुणे :- नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यातर्फे बालेवाडी संजय फार्म येथे बाणेर बालेवाडी महाळुंगे सुस परिसरातील सात हजार कुटुंबांना दिवाळी सरंजाम किटचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अमोल बालवडकर म्हणाले की “दिवाळी सरंजाम ही केवळ नागरिकांची दिवाळी चांगली जावी म्हणून एक भेट आहे. त्यामागे कोणतीही अपेक्षा नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये नागरिकांच्या समस्यांचे निराकरण जर मी केले असेल, त्यांची कामे केली असेल तर निश्चितच नागरिकांचे आशीर्वाद मला मिळतील” अशी भावना यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे कौतुक करताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी “पाच वर्ष अमोल बालवडकर यांनी नागरिकांची दिवाळी गोड करण्याचे काम केले आहे. त्यांनी नेहमीच अडी अडचणीत असणाऱ्या नागरिकांची सेवा केली आहे त्यांच्या समस्या सोडविल्या आहेत. असेच पुढील पाच वर्षात देखील नगरसेवक म्हणून अमोल बालवडकर यांना दिवाळी सरांजामाच्या महत्वाचा कार्यक्रम करण्याची संधी द्यावी” अशी अपेक्षा व्यक्त केली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, कोरोना काळामध्ये नागरिकांना आर्थिक दुरवस्था निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याचं काम अमोल बालवडकर करत आहे.
परभणी आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या “परभणी जिल्हा व मराठवाड्यातील नागरिकांची काळजी अमोल बालवडकर नेहमीच घेत आले आहेत व इथून पुढेही अशीच घेत राहणार”, परभणीचे भाजपा जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनीदेखील माझ्या यांच्या कामांचे कौतुक केले.
केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, आमदार मेघनाताई बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष श्री.जगदिशजी मुळीक, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेवक किरण दगडे पाटील, प्रकाशतात्या बालवडकर, स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर, ज्ञानेश्वर तापकीर, लहु बालवडकर, राहुल कोकाटे, उमाताई गाडगिळ, अस्मिता करंदिकर, प्रल्हाद सायकर, सुंदरशेठ बालवडकर, अनिलतात्या बालवडकर, हनुमंत बालवडकर, अनिल बाप्पु ससार, काळुराम गायकवाड, किरण तापकिर, राखी श्रीवास्तव, उज्वला साबळे, रिना सोमैया, स्मरणिका जुवेकर, अशोक बालवडकर, नामदेव गोलांडे, हनुमंत बालवडकर, अतुल आमले, अनंता चांदेरे,राजु पाडाळे पाटील, राजु पाषाणकर, श्री.रामदास विधाते, रामदास मुरकुटे, राजेश विधाते, भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व इतर मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली..
दरम्यान प्रल्हाद सायकर यांच्या संकल्पनेतून, स्वराज्य प्रतिष्ठान मार्फत बाणेर येथे उभारले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास रुपये २,५१,०००/- ची रोख देणगी अमोल बालवडकर फाऊंडेशन तर्फे दिली, प्रभागातील दिव्यांग गरजु नागरीकाला तीन चाकी सायकल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते भेट दिली.
हा कार्यक्रम यशस्वी व सुनियोजित शिस्तीत पार पाडण्यासाठी अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या सर्व सभासदांची अनमोल साथ लाभली.