Pune Coronavirus | पुण्यात करोना मृतांचा उच्चांक; नवे बाधित 6 हजारांवर, 5609 करोनामुक्त

पुणे – शहरात गेल्या 24 तासांत करोनामुळे तब्बल 75 बाधितांच्या मृत्युची नोंद झाली. त्यामध्ये शहर हद्दीतील 54 आणि जिल्ह्यातील 21 जणांचा समावेश आहे. तर आज नव्याने 6 हजार 6 करोना बाधित सापडले आहेत.

पुण्यातील बाधित संख्येबरोबर आता मृत्युची संख्याही वाढू लागली आहे. शनिवारी (दि. 17) दिवसभरात 24 हजार 506 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली. तर, दिवसभरात 5 हजार 609 बाधित करोनातून बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत 2 लाख 99 हजार 780 बाधित करोनामुक्त झाले आहेत.

करोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये आजची संख्या सर्वाधिक आहे. शहरातील एकूण मृत्यू संख्येने 6 हजार 56 चा आकडा पार केला आहे. दरम्यान, सक्रीय बाधित संख्या 54 हजार 967 इतकी आहे. त्यामध्ये 1 हजार 236 बाधितांची प्रकृती चिंताजनक असून, 5 हजार 717 बाधितांना ऑक्‍सिजन लावण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.