पुणे – दिवसभरात 6 हजार 679 करोना बाधितांची वाढ झाली असून, 58 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 10 पुण्याबाहेरील आहेत. रविवारी आढळलेल्या बाधितांचा समावेश करून शहरात आतापर्यंत बाधितांची संख्या आता 3 लाख 29 हजार 661 झाली आहे. तर 2 लाख 71 हजार 437 जण करोनामुक्त झाले आहेत.
यामध्ये रविवारी डिस्चार्ज दिलेल्या 4 हजार 628 बाधितांचा समावेश आहे.
बाधितांमध्ये 52 हजार 476 रुग्ण ऍक्टिव्ह असून, त्यातील 1 हजार 45 रुग्ण क्रिटिकल आहेत. 4 हजार 956 रुग्ण ऑक्सिजन वर आहेत. दिवसभरात मृत्युमुखी पडलेल्या 48 बाधितांचा समावेश करून, आजपर्यंत शहरात 5 हजार 748 जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. दिवसभरात 24 हजार 773 संशयितांची स्वॅबटेस्ट करण्यात आली.
राज्यातही बाधितांचा आकडा जास्त
राज्यातही करोना बाधितांची संख्या 60 हजारांपेक्षा जास्त असून, दिवसभरात ती 63 हजार 294 नोंदवण्यात आली आहे. तर 349 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील बाधितांची संख्या आता 35 लाखांच्या जवळ पोहोचली असून, आजपर्यंत 34 लाख 7 हजार 245 बाधितांची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात सध्या 31 लाख 75 हजार 585 व्यक्ती होम क्वारंटाइन असून 25 हजार 694 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आजपर्यंत 57 हजार 987 जण करोनाने मृत्युमुखी पडले आहेत.
एकूण बाधितांमधील 27 लाख 82 हजार 161 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामध्ये गेल्या 24 तासांत डिस्चार्ज दिलेल्या 34 हजार 8 रुग्णांचा समावेश आहे.