पुणे –गेल्या पाच-सहा दिवसापासून बाधितांची संख्या कमी झाली असून, गेल्या 24 तासांत 2 हजार 110 नव्या बाधितांची नोंद झाली. संशयितांच्या टेस्टही कमी झाल्या असून, मृतांची संख्या मात्र वाढली आहे.
दिवसभरात 9 हजार 118 संशयितांया स्वॅब टेस्ट झाल्या असून, आजपर्यंत 43 लाख 76 हजार 575 जणांच्या टेस्ट झाल्या आहेत. त्यातील 6 लाख 48 हजार 592 जण बाधित आढळले असून, 6 लाख 18 हजार 560 जण बरे झाले आहेत. 9 हजार 280 बाधितांना मात्र प्राण गमवावे लागले आहेत.
गेल्या 24 तासांत मृत्यू पावलेल्यांची संख्या 14 असून, त्यामध्ये 10 जण शहर हद्दीतील आहेत तर 4 जण हद्दीबाहेरील आहेत. सक्रीय बाधितांची संख्याही कमी झाली असून, ती 20 हजार 752 आहे. त्यातील 48 जण व्हेंटिलेटरवर असून 22 जण इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटरवर आहेत. याशिवाय 263 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. ही संख्याही कमी झाली असून, गेल्या आठवड्यात ती तीनशेच्या वर होती.
दिवसभरात 3 हजार 374 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर सक्रीय बाधितांमधील 4.56 टक्के बाधितांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.