पुणे – शहरातील करोना बाधितांचा दर जो दोन-तीन टक्केच झाला होता तो आता २८ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.
बाधितदर पाच टक्क्यांपेक्षा कमी आल्यानंतर शहरातील लॉकडाऊनचे अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले होते. तरीही बरेचदिवस पुणे शहर हे दुसऱ्या टप्प्यातच होते. कसेबसे त्यातून बाहेर पडल्यानंतर डिसेंबरमध्ये बाधितांची संख्या पुन्हा वाढण्याला सुरुवात झाली आता हा दर २८ टक्क्यांवर गेला आहे.
गेल्या २४ तासांत ५ हजार ३७५ नवे बाधित आढळले आहेत. तर शहरातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय शहर हदीबाहेरील तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरातील मृतांचासमावेश करून आजपर्यंत ९ हजार १४१ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत ४१ लाख ६ हजार ६१४ संशयितांच्या टेस्ट झाल्या आहेत. त्यात ५ लाख ५९ हजार ५४९ जण बाधित आढळले आहेत. त्यातील ५ लाख १६ हजार २२२ बाधित बरे झाले आहेत. रविवारी १९ हजार ११९ संशयितांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत.
सध्या सक्रिय बाधितांची संख्या ३४ हजार १८७ असून, त्यातील २२७ जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर २२ जण व्हेंटिलेटरवर आहेत. याशिवाय २४ जणांना इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.