पुणे- शहरात दिवसभरात 71 करोना बाधितांची नोंद झाली आहे. तर, 103 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत झालेल्या 35 लाख 17 हजार 140 स्वॅब टेस्टमध्ये 5 लाख 03 हजार 804 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यातील 4 लाख 93 हजार 839 बाधित बरे झाले. परंतु, 9 हजार 072 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गेल्या 24 तासांत शहरात मृत पावलेल्या दोघांचा समावेश असून, याशिवाय हद्दीबाहेरील
7 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सक्रिय बाधितांची संख्या 900 पेक्षा झाली कमी
सक्रीय बाधितांची संख्या 900 पेक्षा कमी झाली असून, सध्या ती 893 आहे. त्यातील 141 बाधितांची प्रकृती गंभीर असून, 135 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत 5 हजार 61 संशयितांच्या स्वॅब टेस्ट करण्यात आल्या आहेत.