पुणे : शहरात 106 नवीन करोनाबाधित आढळले

पुणे – शहरात दिवसभरात 106 करोना बाधितांची नोंद झाली आहे. तर, 126 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत शहरात मृत पावलेल्या दोघांचा समावेश असून, याशिवाय हद्दीबाहेरील 1 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

एकूण बाधितांमधील सक्रीय बाधितांची संख्या कमी झाली असून, ती हजाराच्या जवळपास आली आहे. सध्या 1 हजार 56 सक्रीय बाधित असून, त्यातील 166 जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर गेल्या 24 तासांत 5 हजार 488 स्वॅब टेस्ट करण्यात आल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.