पुणे : 129 नवीन करोनाबाधित

पुणे – शहरात दिवसभरात 129 करोना बाधितांची नोंद झाली. तर, 148 जणांना डिस्चार्ज दिला. आजपर्यंत झालेल्या 34 लाख 55 हजार 605 स्वॅब टेस्टमध्ये 5 लाख 02 हजार 795 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यातील 4 लाख 92 हजार 467 बरे झाले. 9 हजार 057 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

यामध्ये गेल्या 24 तासांत शहरात मृत पावलेल्या एकाचा समावेश असून, हद्दीबाहेरील 4 बाधितांचा मृत्यू झाला. एकूण बाधितांमधील 1 हजार 271 बाधित सक्रिय असून, त्यातील 181 जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर 225 जण ऑक्‍सिजनवर आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.