पुणे – शहरात गेल्या 24 तासांत फक्त 86 नव्या करोना बाधितांची नोंद झाली आहे. शिवाय सक्रिय बाधितांची संख्याही कमी झाली आहे.
ही संख्या सोमवारी 1 हजार 347 होती. त्यामध्ये 182 रुग्णांची प्रकृती गंभीर असून, 222 रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.
गेल्या 24 तासांत चार बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यातील तीन मृत पुण्याबाहेरील आहेत. शहरात मृत्यू पावलेल्या एकाचा समावेश करून, आजपर्यंत मृतांची संख्या 9,054 झाली आहे. दिवसभरात 4,651 संशयितांची स्वॅबटेस्ट करण्यात आली.