पुणे – गेल्या काही दिवसांपासून नव्या बाधितांची संख्या दोनशेच्या आतच झालेली आकडेवारीवरून दिसून येत आहे. गेल्य 24 तासांतील बाधितांची संख्याही 185 असून, डिस्चार्ज दिलेल्यांची संख्या 138 आहे.
गेल्या 24 तासांत शहरातील दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे; तर पुण्याबाहेरील तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांमधील सक्रिय बाधितांची संख्याही कमी झाली असून, सध्या ती 1 हजार 487 आहे. त्यातील 184 जणांची प्रकृती गंभीर असून, अन्य 218 जण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात 7 हजार 841 संशयितांची स्वॅबटेस्ट केल्या आहेत.