पुणे – दिवसभरातील बाधितांची संख्या कमी झाली असून, गेल्या 24 तासांत 86 बाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय, नव्या बाधितांपेक्षा जवळपास तिप्पट म्हणजे 237 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गेल्या 24 तासांत शहरातील तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे; तर पुण्याबाहेरील एकही मृत्यू नसल्याची पॉझिटिव्ह गोष्ट आहे.
एकूण बाधितांमधील सक्रीय बाधितांची संख्याही कमी झाली असून, सध्या ती 1 हजार 571 आहे. त्यातील 173 जणांची प्रकृती गंभीर असून, अन्य 280 जण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात 6 हजार 011 संशयितांची स्वॅबटेस्ट केल्या आहेत. आजपर्यंत 4 लाख 99 हजार 459 बाधितांची नोंद झाली असून, त्यातील 4 लाख 88 हजार 884 बाधित बरे झाले आहेत.