पुणे- दिवसभरातील करोना बाधितांची संख्या कमी झाली असून, 107 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे. बरे झालेल्या 239 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आजपर्यंत झालेल्या 32 लाख 38 हजार 694 स्वॅब टेस्टमध्ये 4 लाख 98 हजार 290 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यातील 4 लाख 87 हजार 404 बाधित बरे झाले. परंतु 8 हजार 981 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये गेल्या 24 तासांत शहरात मृत पावलेल्या चार जणांचा समावेश असून, याशिवाय हद्दीबाहेरील तिघांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, एकूण बाधितांमधील 1 हजार 905 बाधित सक्रीय असून, त्यातील 205 बाधितांची प्रकृती गंभीर असून, त्यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर 276 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर गेल्या 24 तासांत 5 हजार 603 संशयितांच्या स्वॅब टेस्ट करण्यात आल्या आहेत, असे मनपा आरोग्य विभागाने सांगितले आहे.