पुणे-गेल्या 24 तासांतील करोना बाधितांची संख्या 218 असून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9 आहे, यात 4 जण पुण्याबाहेरील आहेत. धोका अद्यापही टळला नसल्याचे आरोग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले असून लसीरकण वेगाने सुरू असले तरी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आता शहरातील एकूण बाधितांची संख्या आता 4 लाख 97 हजार 155 झाली आहे; तर त्यातील 4 लाख 86 हजार 056 बाधित बरे झाले आहेत. त्यात रविवारी डिस्चार्ज मिळालेल्या 239 जणांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत 8 हजार 958 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सध्या, 2 हजार 141 सक्रीय बाधित असून त्यातील 211 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर 294 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत 6 हजार 425 संशयितांची स्वॅब टेस्ट झाली आहे.
बाधित 4 लाख 97 हजार 155
बरे झालेले 4 लाख 86 हजार 56
मृत्यू 8 हजार 958 बाधितांचा
सध्याचे सक्रीय बाधित 2 हजार 141
211 गंभीर; 294 जण ऑक्सिजनवर