पुणे – शहरात गेल्या चोवीस तासांत 222 करोनाबाधित आढळले असून, बरे झालेल्या आणि दिवसभरात डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या 107 आहे. बाधित मृतांची संख्या जास्त झाली असून ती 16 आहे.
बाधित मृतांची संख्या वाढली असून, गेल्या 24 तासांतील एकूण 16 मृतांमध्ये 12 जण पुण्याबाहेरील आहेत. तर शहरातील चार जणांचा समावेश आहे. शहरातील सक्रिय रुग्णसंख्येतही आणखी 100 ने वाढ झाली असून, ती 2 हजार 474 वर पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसांत ही संख्या दोनशेने वाढली आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.
सक्रिय बाधितांमधील 204 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, 276 जणांना ऑक्सिजन लावले आहे. ऑक्सिजनवर उपचार घेत असलेल्यांची संख्याही वाढली आहे. आतापर्यंत शहरात 4 लाख 96 हजार 100 जण बाधित झाले असून, त्यापैकी 4 लाख 84 हजार 691 जण बरे झाले आहेत. तर 8 हजार 935 जणांचा मृत्यू झाला आहे.