पुणे – शहरात गेल्या चोवीस तासांत 247 करोना बाधित आढळले असून, बरे झालेल्या आणि दिवसभरात डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या बाधितांपेक्षा दोन ने जास्त म्हणजे 249 आहे.
पुण्यातील पाच रुग्णांसह 6 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हद्दीबाहेरील बाधित मृतांची संख्या एक आहे. शहरातील सक्रीय रुग्णसंख्येतही वाढ झाली असून, ती 2 हजार 282 वर पोहोचली आहे. अजूनही ही संख्या जास्त असल्याने चिंता कायम आहे.
सक्रीय बाधितांमधील 207 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर 298 जणांना ऑक्सिजन लावण्यात आले आहे. ऑक्सिजनवर उपचार घेत असलेल्यांची संख्याही वाढली आहे. आतापर्यंत शहरात 4 लाख 95 हजार 215 जण बाधित झाले असून, त्यापैकी 4 लाख 84 हजार 016 जण बरे झाले आहेत. तर 8 हजार 917 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान चोवीस तासांत 7 हजार 601 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे.