पुणे –दिवसभरात 294 नव्या करोना बाधितांची नोंद करण्यात आली असून, 347 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. याशिवाय 7 जणांचा शहरात मृत्यू झाला असून, त्यात पुण्याबाहेरील दोघांचा समावेश आहे. आजपर्यंत 28 लाख 58 हजार 94 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली. त्यातील 4 लाख 86 हजार 365 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर त्यातील 4 लाख 75 हजार 128 जण बरे झाले आहेत. तर 8 हजार 749 जणांचा मृत्यू झाला आहे.
सद्यस्थितीत बाधितांमधील 2 हजार 488 जण सक्रीय बाधित असून, त्यातील 224 जणांची प्रकृती गंभीर असून, 331 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. दिवसभरात 7 हजार 930 संशयितांच्या स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे.