पुणे (प्रभात वृत्तसेवा) – शहरात गुरूवारी कोवॅक्सिनचे सात केंद्रांवर डोस मिळणार असून, परंतु पुन्हा एकदा डोससंख्या कमी करण्यात आली असून, प्रत्येक केंद्रांवर आता 300 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केंद्रसंख्या मात्र सातच ठेवण्यात आली आहे.
18 वर्षांवरील सर्व नागरिकांना बुधवारी कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 20 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
याशिवाय 15 जुलै पूर्वी कोवॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्या 18 वर्षांवरील नागरिकांना बुधवारी 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे तर 20 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दी स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.
कोवॅक्सिनचे डोस मिळण्याची केंद्रे
येरवडा- राजीव गांधी रुग्णालय
कोथरूड- कै. जयाबाई सुतार दवाखाना
कर्वेनगर- कै. बिंदूमाधव ठाकरे दवाखाना
गाडीखाना- कै. मालती काची दवाखाना
महंमदवाडी- कै. दशरथ भानगिरे दवाखाना
मंगळवारपेठ – कमला नेहरू रुग्णालय
ससून सर्वोपचार रुग्णालय