प्रभात वृत्तसेवा
पुणे ( Pune corona vaccination update ) – शहरात करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होऊन आठ महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, आतापर्यंत फक्त 7 लाख 42 हजार 923 पुणेकरांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.
आकडेवारीनुसार, 18 वर्षांवरील नागरिकांचे सुमारे 32 लाख 26 हजार 196 जणांचे लसीकरण अपेक्षित आहे. हे पाहता दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या पाहता हा आकडा केवळ 23.02 टक्केच असल्याने करोना संकट अजूनही गंभीरच आहे, तर आतापर्यंत 20 लाख 65 हजार 440 पुणेकरांना लसीचा पहिला डोस मिळालेला आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या लोकसंख्येला दुसरा डोस देण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. ( Pune corona vaccination update )
अपेक्षित लोकसंख्येचे लसीकरण
60 वर्षांवरील
3 लाख 89 हजार 900
45 ते 59
4 लाख 34 हजार 873
18 ते 45
24 लाख 1 हजार 423
आतापर्यंत झालेले लसीकरण
28 लाख 18 हजार 212
शहरात आतापर्यंत लस घेऊनही
41 जणांचा मृत्यू
एक डोस घेतलेल्या
21 जणांचा मृत्यू
दोन डोस घेतलेल्या
20 जणांचा मृत्यू
बहुतांश मृत्यू 60 वर्षांवरील नागरिकांचे आणि
अन्य आजार असलेल्यांचे
3,068 जणांना पहिला डोस घेतल्यानंतरही करोनाची बाधा
2036 जणांना दुसरा डोस घेतल्यानंतरही करोनाची बाधा
मृत्यूचे प्रमाण नगण्य
गेल्या 17 महिन्यांत करोनाने शहरातील सुमारे 8885 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, लस घेतल्यानंतरही करोना होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. तर, लस घेऊन गंभीर संसर्गाने मृत्यू होण्याचे प्रमाण बाधितांच्या 1 टक्क्यापेक्षाही कमी आहे. त्यामुळे लसीकरण आवश्यकच आहे. मात्र, शासनाकडून उपलब्ध होणारा लसींचा साठा पाहता, हा वेग वाढवण्याची वेळ आली आहे.