पुणे- पुण्यात आज दिवसभरात १ हजार १०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनाबाधितांची वाढ मोठ्या प्रमाणात कमी झाली असून, आज केवळ ७७९ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे पुणेकरांना दिलासा देणारी आकडेवारी आहे.
सद्यस्थितीला शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९४३ कोरोनाबाधित गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ५२० जण व्हेंटिलेटरवर तर ४२३ जण आयसीयूमध्ये आहेत. तर ३ हजार ३९३ रूग्णांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात उपचारादरम्यान शहरात ५२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, यापैकी १८ जण हे पुण्याबाहेरील आहेत.
दरम्यान, शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ४२ हजार ९१५ झाली असून, यापैकी अॅक्टिव्ह रूग्णसंख्या १७ हजार २२८ इतकी आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्या ऑक्टोबर महिन्यापासून अनलाॅक पाचला सुरुवात होणार आहे. त्यात नेमके काय बदल होतात. यावर पुढच्या परिस्थीती कळेल.